महाराष्ट्र विधानसभेत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली; बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक उमेदवार

महाराष्ट्र विधानसभेत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली; बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक उमेदवार

बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक उमेदवार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्राच्या विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा आकडा मोठा तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सर्वाधिक

  • 288 जागांसाठी 2086अपक्ष उमेदवार रिंगणात

  • बहुजन समाज पक्षाकडून 237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

यातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळत असून अनेक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सर्वाधिक आहेत.

288 जागांसाठी 2086 अपक्ष उमेदवार रिंगणात असून 2086 उमेदवारांमध्ये मुख्य पक्षातील किंवा तिकीट पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केलेल्यांचा ही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. बहुजन समाज पक्षाकडून 237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून वंचित बहुजन आघाडीकडून 200 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com