NCP(SP) Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. इच्छुक उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. या पार्श्वभूमीवर मविआ, महायुतीतील घटक पक्षांकडून उमेदवारीची यादी जाहीर करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाकडून तिसरी आणि अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 9 उमेदवारांचा समावेश आहे. यानंतर आणखी 7-8 उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत 9 जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
'लाडकी बहिण'वरून टोला
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून विधानसभा निवडणुकांसाठी एकूण 11 महिलांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. आम्ही लाडकी बहिण म्हणून नुसत्या घोषणा करत नाही. तर ते कृतीत दाखवून देतो असं म्हणत जयंत पाटील यांनी महायुतीला टोला लगावला आहे.
तसेच 'लाडकी बहिण योजने'बाबत प्रश्न विचारला असता, "लाडकी बहिण योजना, भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षाने पैसे नसल्यामुळे बंद केली आहे. आमच्या पक्षाचा जाहीरनामा अद्याप घोषित करण्यात आला नाही." लवकरच जाहीरनामा घोषित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर देशमुख यांनी केलेल्या असभ्य टीकेचा जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लाडकी बहिण म्हणून लाडक्या बहिणीविषयी अत्यंत असभ्य भाषा वापरण्यात आली. जी महाराष्ट्रातील महिला कधीच सहन करणार नाहीत. ज्या बहिणीविषयी अपशब्द वापरले तिच्यावरच पुन्हा केस करत आहेत. लाडक्या बहिणीला नेस्तनाबूत करण्याचे ठरवले आहे. महिलांना 1500 रूपये देऊन त्यांच्याविषयी काहीही विधान करू शकता हे काय लायसन्स काढलंय का असा सवाल त्यांनी विचारला आहे.
शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर
हिंगणघात - अतुल वांदीले
चिंचवड - राहूल कलाटे
परळी - राजेसाहेब देशमुख
कारंजा - ज्ञायक पाटणी
हिंगणा - रमेश बंग
अणुशक्तीनगर - फहाद अहमद
मोहोळ - सिद्धी कदम
भोसरी - अजित गव्हाणे
माजलगाव - मोहन जग
भाजप निवडणूकीचं यंत्र असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. वांद्रे टर्मिनस येथील चेंगराचेंगरीवरून जयंत पाटलांनी रेल्वेमंत्र्यांना लक्ष केलं आहे. तसेच अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना अणुशक्ती नगर येथील उमेदवारीबाबत ही वक्तव्य केलं आहे.