Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

भंडारा गोंदिया जिल्ह्यात सात पैकी सहा सीट महाविकास आघाडीने गमावल्या आहेत. अटीतटीच्या लढाईत नाना पटोले यांचा शेवटच्या क्षणी विजय झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on
  • थोडक्यात

  • भंडारा गोंदिया जिल्ह्यात सात पैकी सहा सीट महाविकास आघाडीने गमावल्या.

  • अटीतटीच्या लढाईत नाना पटोले यांचा शेवटच्या क्षणी विजय

  • नाना पटोले यांना स्वत:च्या जिल्ह्यात फक्त एकच सीट काढता आली.

भंडारा गोंदिया जिल्हा हा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा मानला जातो. भंडारा गोंदिया जिल्ह्यात सात पैकी सहा सीट महाविकास आघाडीने गमावल्या आहेत. अटीतटीच्या लढाईत नाना पटोले यांचा शेवटच्या क्षणी विजय झाले आहेत. पण गड गेला सिंह आला अशी अवस्था महाविकास आघाडीची झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांना स्वत:च्या जिल्ह्यात फक्त एकच सीट काढता आली. त्यामुळे नाना पटोले प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

महायुतीने तब्बल २३५ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार २८८ पैकी २३६ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३७, शिवसेनेला (शिंदे) ५८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड झालं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com