मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळली- नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळली- नाना पटोलेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडच्या निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा गाजला मात्र आता महाराष्ट्रात मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडच्या निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा गाजला मात्र आता महाराष्ट्रात मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही दिवसांवर मतदान प्रक्रिया आली असल्यामुळे यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणीसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक मतदारांची नावे आणि व्हिडिओ दाखवत निवडणूक आयोग आणि महायुतीवर टीकास्त्र डागले आहे. विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत असून ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत भाजपला भारी पडली असल्याचे निकालातून दिसले होते. महायुतीला अनेक जागावर महाविकास आघाडीने धक्का दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी विरोधात भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष षडयंत्र करत आहेत. निवडणूक आयोग मोदीशाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे नेते आरोप करत असताना भाजपही मैदानात उतरला आहे. भाजपच्या नेत्या आणि विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी एक्स पोस्ट करत थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. ईव्हीएम’नंतर आता ‘मतदार यादी’चा बहाणा आहे...पराभवाच्या कारणांचा पाया आधीच रचला जातो आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे.

महाविकास आघाडीकडून राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे फॉर्म ७ चा गैरवापर, मतदार यादीतील त्रुटी, चुका याबाबत लक्ष वेधले आहे. निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करम्यात आला आहे. पण याचा फायदा महाविकास आघाडीला होईल की महायुतीला होईल हे पाहणे महत्वाचे आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com