वरळी कोळीवाड्यात मतदारांना कोणी केली भांडी वाटप?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचारसभा सुरु आहेत. प्रचारसभांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना आमिष दिलं जात आहे. काही ठिकाणी अशा घटना उघडकीस आल्या आहेत. वरळी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी भांडी वाटप करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
थोडक्यात
वरळी विधानसभा मतदारसंघात भांडीवाटप?
शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे कार्यकर्ते भांडी वाटप करत असल्याचा आरोप
भांडी वाटप करत असताना रंगे हात पकडण्यात आल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा दावा
वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे कार्यकर्ते वरळी कोळीवाड्यात मतदारांना भांडी वाटप करत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलेली भांडी पोलिसांना दाखवली. मात्र, पोलिस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली आहे.
तसेच वरळीतील येथे एका बंद खोलीत भांड्याचे अनेक बॉक्स आढळून आले असल्याचे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. मिलिंद देवरा यांच्या कार्यकर्त्यांकडून वरळीत भांडी वाटप करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भांडी वाटप करत असताना रंगे हात पकडण्यात आल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.