sunil shelke vs bhegade
sunil shelke vs bhegade

मावळ विधानसभा मतदारसंघावरून महायुतीतून बंडखोरी

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी राजीनामा दिला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी राजीनामा दिला आहे. त्या पाठोपाठ भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील राजीनामा देऊन बापू भेगडे यांच्या बंडखोरीला समर्थन दिलं आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांचे खंदे समर्थक आमदार सुनील यांना उमेदवारी मिळाली. आज त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज ही दाखल केला आहे. आमदार शेळके यांना विरोधी पक्षाचे नाही तर माहितीतूनच विरोध असल्यामुळे त्यांच्यापुढे बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. विधानसभेच्या आधीपासूनच शेळके यांच्या उमेदवारीला विरोध होता. शेळके यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपने केला होता.

खऱ्या अर्थाने याच सभेतून शेळके यांच्या विरोधात प्रचार सुरू झाला. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि बंडखोर बापू भेगडे यांनी सतत आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात भूमिका मांडत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर होताच बापू भेगडे आणि बाळा भेगडे यांनी पक्ष पदाचा राजीनामा देऊन थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

महायुतीतील हे बंड थंड होण्याचं नाव घेत नाही. बापू भेगडे दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला भाजपचा देखील पाठिंबा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मावळ मधील ही निवडणूक अधिकच रंजक होणार असून सुनील शेळकेंपुढे ही बंडखोरी रोखण्याचं आव्हान असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com