rajendra gavit enters shivsena
rajendra gavit enters shivsena

काँग्रेस, भाजप, शिवसेना ते शिंदे गट; माजी खासदाराचं पाचवं पक्षांतर

पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी याआधी काँग्रेसमधून राज्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना पुन्हा भाजप आणि आता त्यांना पालघर विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांनी पाचव्यांदा पक्षांतर केले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्रामध्ये 2019 पासून राजकारणामध्ये महाभारत पाहायला मिळाले. सध्या या राजकारणात बंडाचे वारे वाहत आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कधी कोणता नेता बंडखोरी करेल याचा नेम नाही.सध्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशांचा धडाका कायम आहे.

पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि बोईसर येथील माजी आमदार विलास तरे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील इन्कमिंगने संघटनेला बळ मिळाले आहे.

पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी याआधी काँग्रेसमधून राज्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना पुन्हा भाजप आणि आता त्यांना पालघर विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांनी पाचव्यांदा पक्षांतर केले आहे.

विलास तरेही शिवसेनेत

बोईसर येथील माजी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते याआधी अखंड शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. आता ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना बोईसर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com