मुंबई, पुणे
नवाब मलिक आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता; अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या चौथ्या यादीतही नवाब मलिकांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. यातच नवाब मलिक यांनी ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
आज नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे मात्र नवाब मलिक अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.