Shivsena (UBT): निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरु
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजलं आहे. विधान निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरु झाल्याचे पाहायला मिळता आहे. राजन तेली, दीपक साळुंखे, सुरेश बनकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
ठाकरेंनी महायुतीला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे सुरेश बनकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दीपक साळुंखे आणि भाजपचे राजन तेली यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.
कोण आहेत राजन तेली?
तब्बल 19 वर्षांनी माजी आमदार राजन तेलींची ठाकरेंच्या पक्षात घरवापसी
1991मध्ये राजन तेलींची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
1995 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषवलं
1997 मध्ये तेलींवर कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी
2005मध्ये नारायण राणेंसोबत शिवसेना सोडत, काँग्रेसमध्ये प्रवेश
2007 मध्ये राजन तेलींची विधान परिषदेवर आमदार म्हणून वर्णी
2016मध्ये राजन तेलींना भाजपानं राज्य सचिवपदी विराजमान केलं