MNS Seat Sharing: मुंबई-पुण्यातील मनसे उमेदवारांची आज घोषणा? राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील मनसे उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील मनसे उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. पुण्यातील मनसेच्या नेत्यांची मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक आहे. मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबईमधील शिवतीर्थ या निवासस्थानी पुण्यातील नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे आणि याच बैठकीत पुण्याचे मनसेचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. तर आता पुण्यात मनसेच्या वतीने कोणते उमेदवार पुढे येणार आहेत हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com