Blocking the convoy of the candidate who came for campaigning: प्रचारासाठी गावात आलेल्या उमेदवाराचा ताफा अडवल्याचा प्रकार

Blocking the convoy of the candidate who came for campaigning: प्रचारासाठी गावात आलेल्या उमेदवाराचा ताफा अडवल्याचा प्रकार

माजलगाव मतदार संघातील एक अपक्ष उमेदवार प्रचारासाठी पहाडी दहिफळ या गावात गेले असता त्यांचे वाहन अडविण्यात आले. यादरम्यान घोषणाबाजी करत त्यांना गावातून परत पाठविण्यात आले.
Published by :
Team Lokshahi
Published on

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांचा ताफा अडविण्याचा प्रकार समोर आला होता. विधानसभा निवडणुकीत देखील असाच काहीसा प्रकार समोर आल्यानंतर बीड पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या सर्व आरोपींचा पोलीस शोध घेत असून कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिला आहे.

माजलगाव मतदार संघातील एक अपक्ष उमेदवार प्रचारासाठी पहाडी दहिफळ या गावात गेले असता त्यांचे वाहन अडविण्यात आले. यादरम्यान घोषणाबाजी करत त्यांना गावातून परत पाठविण्यात आले. आमच्या गावात प्रचार करायचा नाही असे त्यांनी उमेदवाराला सांगितले. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांच्या वाहनाचा ताफा अडविण्यात आला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत हा प्रकार रोखण्याकरिता पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com