Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज भरलं जाणार आहेत. आज धनंजय मुंडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 11 ते 3 या दरम्यान धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

कोणतंही शक्ती प्रदर्शन होणार नाही असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पंकजा मुंडे आणि महायुती मधील नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे. धनंजय मुंडे यांनी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com