बीडमध्ये माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना - धनंजय मुंडे
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे. त्यांनतर आता सर्वत्र प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशातच आता प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
धनंजय मुंडे यांनी मंगळवारपासून परळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. पहिल्याच जाहीर भाषणात धनंजय मुंडे यांनी माझा पराभव करण्यासाठी व्ह्यूरचना केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा नेमका रोख कुणावर? हा सवाल उपस्थित होतो आहे.
परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीतील व्यापारांशी संवाद साधला. दरम्यान झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी मला दोन निवडणुकीचा मुहतोड जवाब द्यायचा आहे. असं म्हटलं आहे. मी अडचणीचा ठरू शकतो म्हणून माझा अस्त करण्याची तयारी सुरू आहे. तर लोकसभेत पंकजा ताईंचा जसा पराभव केला तसा विधानसभेत माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणावर? असा सवाल उपस्थित होत आहे.