Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
Published on

थोडक्यात

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. यातच काल जरांगे पाटील यांनी अंतरवालीतून उमेदवार देण्यात येणाऱ्या मतदारसंघांची घोषणा केली. यामध्ये बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मात्र मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. एका जातीवर निवडणून येणं शक्य नाही. हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. मराठा समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत.असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com