मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार; गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केलं आहे.
विधानसभेसाठी जरांगे मराठा उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, हा जरांगे पाटील यांचा विषय आहे त्यांनी काय करावं, काय करु नये हा त्यांचा विषय आहे. आमचा विषय आमच्याकडे आहे. आमचे मतदार आमच्यासोबत आहेत. कोणाला पाडायचं, कोणाला नाही ते जनता ठरवणार आहे. ते कोणताही पक्ष, नेते ठरवणार नाहीत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकांवर आमचा विश्वास आहे, आमच्या कामावर आमचा विश्वास आहे. आमचा एवढा 5 वर्षातल्या जनसंपर्कावर आमचा विश्वास आहे. म्हणून मला असं वाटतं की, आता घोडामैदान समोर आहे. 23 तारखेला आपण बघावं काय होते, काय नाही होत. असं गिरीश महाजन म्हणाले.