मोठी बातमी! मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणात; भूमिका केली जाहीर
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल आहे. त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. तसच जिथे निवडून येतील तिथे उमेदवार उभे करावे.एसी एसटीच्या जागी उमेदवार देऊ नये, जिथं उमेदवार उभे करणार नाही तिथे आपल्याला जो ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल त्याला मतदान देऊ असं ते म्हणाले.
जरांगे पाटील काय म्हणाले?
पडायचे पाडा, उभा करायचे करा, माझी राजकारणकडे जाण्याची इच्छा नाही, मात्र समाजा पुढे मी जात नाही. राजकारणाच्या नादात आरक्षणाचा लढा बंद पडला नाही पाहिजे.
महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सख्खे मावस भाऊ आहेत. आणि मी मध्ये सापडलेला सावत्र भाऊ. आपण उभा केले की महायुती खुश होते. आपण उभा केले नाही तर महाविकास आघाडी खुश होते.
आपल्याला वेगळा मार्ग काढावा लागणार आहे. आपल्यामुळे यांच्या तिकिटाचे यादी दिल्लीत पडून आहे. आणखी जाहीर नाही. मी 30 ते 40 दिवस राजकारणात जातोय, नंतर पुन्हा सर्व समजाचा.
जिथे निवडून येतील तिथे उमेदवार उभे करणार. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारधारेशी असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं. ज्या ठिकाणी आपण उभा करायचं नाही, तिथे आपण जो 500 रुपयांच्या बाँडवर लिहून देईल त्याला आपण निवडून आणायचे बाकीचे सर्व पाडायचे. दलित, मुस्लिम आणि मराठा समीकरण जुळून उमेदवार उभे करणार असल्याच ते म्हणाले.
29 तारखेला जाहीर करू कोण आपला उमेदवार असणार. इच्छुकांनी सर्वांनी फॉर्म भरावे, ज्यांना फॉर्म काढायचे सांगितले त्यांनी फॉर्म काढावे, अस आवाहन त्यांनी केलं आहे.