Manoj Jarange: मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार ; राजकारणातून टीकांचा भडीमार

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून मनोज जरांगे यांनी माघार घेतलेली आहे. एकाच जातीच्या आधारावर निवडणूक लढण शक्य नाही असं जरांगे म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून मनोज जरांगे यांनी माघार घेतलेली आहे. एकाच जातीच्या आधारावर निवडणूक लढण शक्य नाही असं जरांगे म्हणाले. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे. मित्र पक्षांकडून यादी नाही पण निवडणूक लढणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

यावर संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही स्वतः हा त्यांचा जो लढा आहे तो राजकीय मानत नाही हा सामाजिक लढा आहे. ही एक सामाजिक चळवळ आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटील यांनी काय भूमिका घ्यावी आणि कशा प्रकारे घ्यावी याच मार्गदर्शन आम्ही करणार नाही. नक्कीच त्यांच्या लढ्याला कायमस्वरुपी पाठबळ राहिल.

तर वाघमारे म्हणाले की, जरांगे पाडूल फुसका बार आहे. जरांगे पाटलांमध्ये तेवढी धमक नाही आहे उमेदवार उभा करण्याची. तिथे आपल्यामध्ये तेवढी धमक नसताना मित्रपक्षाच्या माथ्यावर खापर फोडण्याचं काम जरांगे पाटील करत असतील. जरांगेना अनेक पक्षाने उमेदवारी अर्ज देण्याच काम केलं फक्त गर्दी अर्ज घेण्याची रसद मिळवायची.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com