Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला विजय मिळाला आहे. महायुतीचा सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला आहे. सोमवारी वानखेडे स्टेडियमवर महायुताचा शपथविधी पार पडणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल.
थोडक्यात
महायुती सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला
शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर
महायुतीचा शपथविधी सोमवारी होणार
वानखेडे स्टेडियमवर पार पडणार शपथविधी
राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. महायुतीचा सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला असून वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष महायुतीच्या शपथ विधीकडे वेधले आहे.