Maharashtra vidhansabha results 2024 : मोदींनी सभा घेतलेले किती उमेदवार विजयी?

Maharashtra vidhansabha results 2024 : मोदींनी सभा घेतलेले किती उमेदवार विजयी?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काही जागांवर प्रचारसभा घेतल्या होत्या त्यापैकी कोणत्या ठिकाणावरून कोणता उमेदवार विजयी झाला हे जाणून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबंरला झाले आणि 23 नोव्हेंबंरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला होत कारण, या निकालात मविआ जिंकेल अशी अपेक्षा अनेक लोकांकडून करण्यात आलेली होती मात्र मविआ फक्त 55 च्या आसपास जागा मिळाला आणि राज ठाकरेंच्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नसून मनसेचे खाते देखील उघडले गेले नाही. आता या निकालावरून विरोधीपक्षाकडून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मविआ आणि इतर पक्षाकडून मोठा संघर्ष पाहायला मिळाला मात्र महायुतीला २२० जागांवर बहुमत मिळवत आपला विजय कायम ठेवला. अशातच महायुतीमधून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीत तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या

यामध्ये महायुतीने २२० जागांवर बहुमत मिळवला असून त्यात भाजप 128 जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तर शिंदे शिवसेनेला 53 जागा तर अजित पवार राष्ट्रवादीला 36 जागा आहेत. तर मविआमध्ये 55च्या आसपास जागा मिळाल्या असून त्यात काँग्रेस 16 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 10 जागा एवढ्याच जागांवर वर्चस्व मिळवता आल्या आहेत. तर इतर पक्षांना 12 जागा मिळवता आल्या आहेत मात्र राज ठाकरेंच्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नसून मनसेचे खाते देखील उघडले गेले नाही.

मोदींनी महाराष्ट्रात सभा घेललेले किती उमेदवार विजयी?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काही जागांवर प्रचारसभा घेतल्या होत्या त्या ठिकाणी भाजप उमेदवारांनी चांगल्या फरकाने विजय मिळवलेला पाहायला मिळाला. त्यापैकी कोणत्या ठिकाणावरून कोणता उमेदवार विजयी झाला हे जाणून घ्या.

1) नरेंद्र मोदींनी धुळे शहरातून प्रचारसभांना सुरुवात केली, आणि येथून भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा 45000 मतांच्या फरकाने विजय झाला आहे.

2) नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल ढिकले हे 87 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.

3) नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघात भाजपचे उमेदवार भीमराव केराम हे 5636 मतांच्या फरकाने विजयी झाले.

4) गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार बंटी भांगडिया हे 9853 मतांच्या फरकाने विजयी झाले.

5)सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर उत्तर मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

6) पुण्यातील कोथरुड मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे देखील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

7) छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजचे अतुल सावे हे 2161 मतांच्या फरकाने विजयी झाले.

8)पनवेलमध्ये भाजप नेते प्रशांत ठाकूर हे 51091 मतांच्या फरकाने विजयी झाले.

9) मुंबईमध्ये भाजचे उमेदवार आशिष शेलार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com