विधानसभा निवडणूक 2024
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाला किती जागा?
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून अजून एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून अजून एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र जागावाटपामध्ये कुणाली किती जागा मिळतील, याचा एक फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.
मुंबईतील बहुतांश जागांवर शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेस-103 ते 108 जागांवर निवडणूक लढेल. शिवसेना ठाकरे गटाला 90 ते 95 जागा देण्यात येणार आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 85 जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागावाटपाचा हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.