bjp
bjp

Lokshahi Marathi Rudra Exit Poll : लोकशाही-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • लोकशाही-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजप ठरणार मोठा पक्ष

  • महायुतीला 128 ते 142 जागा मिळण्याची शक्यता

  • मविआला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज

विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. आता 23 नोव्हेंबरला निकाल लागणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर लोकशाही-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

महायुतीला 128 ते 142 जागा मिळण्याची शक्यता आहे तर मविआला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासोबतच भाजपला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता असून शिवसेनेला 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर राष्ट्रवादीला 18 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 39 ते 43 जागा मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 38 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून काँग्रेसला 48 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com