नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती
महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीकडून सोमवारी शपथविधी समारंभ पार पडणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.
नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती लागला आहे. मंत्रिपदाचा 21-12-10 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. भाजपला 21, शिवसेनेला 12, राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. फॉर्मुल्यावर दिल्लीच्या वरिष्ट नेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तिन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत.
थोडक्यात
नव्या मंत्रिमंडळाचा पदांची शक्यता
अंदाजित फॉर्म्युला २१-१२-१०
भाजपला २१, शिवसेनेला १२, राष्ट्रवादीला १० मंत्रिपदांची शक्यता
फॉर्म्युलात अंतिम क्षणी बदल होण्याचीही शक्यता
तीनही मुख्यनेते, दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतर बदल होणार -सूत्र
महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या १३२ आमदार त्यामुळे फाॅर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला २२-२४ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ५७ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला १०-१२ मंत्रिपदं येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला ४१ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला ८-१० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.