nitesh rane vs sandesh parkar
nitesh rane vs sandesh parkarAdmin

नितेश राणे यांच्या विरोधात मविआने कुणाला उतरवलं मैदानात?

कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे. नितेश राणे यांना यावेळी आमदारकीची हॅटट्रिक साधता येणार का? याबाबत मतदारसंघात तर्क- वितर्क लढविले जात आहेत.

नितेश राणे यांना सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडीने आपणास उमेदवारी दिली आहे. सत्तेचा उद्रेक झाल्यानंतर भल्या भल्या नेत्यांचा पराभव झाला आहे. नारायण राणे यांनी आपला पराभव परमेश्वर जरी आला तरी होवू शकत नाही, असे म्हटले होते. पण त्यांचा पराभव आमच्या वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघात केला.

कार्यकर्ते आणि जनता ठरवते त्यावेळी त्याचा निकाल वेगळा येतो. लोकांमध्ये भय निर्माण करणे, दहशत निर्माण करायची, लोकांमध्ये दबावाचे राजकारण करायचे, जिल्हा बँकेमध्ये कामाला लावतो, असे आमिश द्यायचे, असे करून निर्णायक मते आपल्याकडे वळवायची. राणेशाहीला लोक कंटाळली आहेत. सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे आपण आहोत. त्यामुळे जनता आपल्या पाठीशी असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com