Nilesh Rane|भाजप नेते निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार?
विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरु आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून जागावाटप आणि उमेदवारांची निश्चिती यासाठी धावपळ सुरू आहे.
भाजप नेते निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे येत्या बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी माजी खासदार निलेश राणे हे कुडाळमध्ये शिवसेनेत भव्य प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात कुडाळ येथे भव्य प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे.
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून निलेश राणे यांचे नाव निश्चित आहे. माजी खासदार निलेश राणे हे भाजपाकडून नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही उमेदवारी लढवणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.