jyoti mete enter ncp sp
jyoti mete enter ncp sp

शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची धुरा सांभाळणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
Published by :
Team Lokshahi
Published on

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची धुरा सांभाळणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशनंतर मराठवाड्यात शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे. ज्योती मेटे या बीड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांनी त्यांना बीड मतदारसंघासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मी हा प्रवेश केला आहे, असं ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे.

बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळणार? ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. पण बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत त्यांनी स्वत: देखील सूचक विधान केलेलं आहे.

बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळणार?

ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. पण बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत त्यांनी स्वत: देखील सूचक विधान केलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com