विधानसभेतही 'सांगली पॅटर्न! 'जयश्री वहिनी ह्या माझ्याच उमेदवार त्यांना निवडून द्या' विशाल पाटील यांच आवाहन
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा सांगली पॅटर्न राबवला आहे. बंडखोरी करून जयश्री वहिनी पाटील हे माझेच उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्या असे जाहीर आव्हान त्यांनी केले आहे. त्यामुळे सांगलीमध्ये आता तिरंगी लढत मिळणार आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील तर भाजपचे उमेदवार सुधीर गाडगे आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री वहिनी पाटील यांच्यामध्ये ही लढत होत आहे. आज जयश्री वहिनी पाटील यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत भव्य सभा सांगलीच्या काँग्रेस कमिटी समोर घेतली. यावेळी या सभेला खासदार विशाल पाटील आणि त्यांचे भाऊ माजी मंत्री प्रतीक पाटील हेही उपस्थित होते.
यावेळी विशाल पाटील म्हणाले, मी सर्वांची क्षमा मंगतो. जयश्री वहिनी यांना उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही. विश्वजित कदम यांनी कमी पडलो. तसेच आमच्या वसंतदादा कुटुंबाला एकदा ही काँग्रेस पक्ष कडून उमेदवारी मिळाली नाही. काय नेमकी चूक या वसंतदादा घराण्याने केलेले आहे काँग्रेस पक्षाबाबत हे अजून आम्हाला कळालं नाही. निष्ठा आम्ही सोडली नाही. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला हा का न्याय होत गेला हे अध्यापिक कळू शकले नाही.
जयश्री वहिनी माझ्या उमेदवारी सर्वात पुढे होत्या मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये अशी शंका निर्माण झाली. ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा ह्याच विकास आघाडीचा घटक आहे.
काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करणाऱ्या सारखा सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे. आणि हा माझा उमेदवार आहे हे मी जाहीर करतो. येणाऱ्या निवडणुकीत जयश्री वहिनी यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदाच महिला आमदार निवडणार आहे. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिला आहे. तसेच माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या असे विशाल पाटील यांनी केले आवाहन.