मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत? कुठे घडली घटना?
महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानप्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यात जास्तीत जास्त मतदान केलं जावं यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे. मात्र, कोल्हापुरामध्ये एक वेगळाच प्रकार आला आहे. कोल्हापुरात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
थोडक्यात
कोल्हापुरात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचा दावा...
'मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत'
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार के पी पाटील यांनी घेतला आक्षेप
एकाच वेळी दोन्ही बटणांची लाईट पेटत असल्याची तक्रार
राधानगरीमधील बर्गेवाडी गावातील घटना
कोल्हापुरात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 'मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत जात असल्याचा आक्षेप ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार के पी पाटील यांनी घेतला आहे. एकाच वेळी दोन्ही बटणांची लाईट पेटत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. राधानगरीमधील बर्गेवाडी गावामध्येही घटना घडली आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.