imtiyaz jalil shares video
imtiyaz jalil shares video

भाजपाने संभाजीनगरात पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

भाजपाने संभाजीनगरात आंबेडकरनगर या झोपडपट्टीत पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागलं आहे. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वी घडलेल्या गैरप्रकारावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

संभाजीनगरात भाजपकडून पैसै वाटपाचा आरोप एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जलील यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवरून त्यांनी भाजपला लक्ष केले आहे. भाजपचे नेते अतुल सावे यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

थोडक्यात

  • भाजपाने संभाजीनगरात आंबेडकरनगर झोपडपट्टीत पैसे वाटल्याचा गंभीर आरोप

  • झोपडपट्टीत महिलांना 500 रुपये वाटण्यासाठी आलेल्या नेत्याला महिलांचा घेराव

  • जलील यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट

  • भाजप नेते अतुल सावेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमआयएम नेते इम्तियाज जलिल यांनी शेअर केलेली पोस्ट पाहा

भाजपाने संभाजीनगरात आंबेडकरनगर या झोपडपट्टीत पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. झोपडपट्टीत महिलांना 500 रुपये वाटण्यासाठी आलेल्या नेत्याला महिलांनी घेराव घातला असा आरोप जलील यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करून करण्यात आला. त्यामुळे संभाजीनगरात अन्यायकारक निवडणूक झाल्याचं म्हणत भाजप नेते अतुल सावेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही जलील यांनी केली आहे. संभाजीनगरात अनेक ठिकाणी खुलेआम पैसे वाटप होत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

दरम्यान, भाजप नेते अतुल सावे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. जलील यांनी दाखवलेल्या व्हिडिओशी आपला संबंध नसल्याचे सावे यांनी म्हटलं आहे. तसेच जलील यांनी आरोप करण्याआधी पुरावे दाखवावे. जलील यांचा पराभव होणार हे निश्चित असल्यामुळे जलील असे आरोप करत आहेत. जलील यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचे सावे यांनी म्हटले आहे. पाहा अतुल सावे यांची फोनवर घेतलेली संपूर्ण प्रतिक्रिया-

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com