Maharashtra Assembly Elections : मोठी बातमी! राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टी संदर्भातील परिपत्रक शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी जास्तीत जास्त लोकांना करता यावं यासाठीराज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
दरम्यान, निवडणुक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक जाहीर केली. त्यानुसार या निवडणुकीत २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. ही निवडणुक एकाच टप्प्यात पडणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल.