भाजपा नेते गोपाळ शेट्टी उमेदवारी मागे घेणार का? देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर सांगितले...
बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता गोपाळ शेट्टी यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना गोपाळ शेट्टी म्हणाले की, मी पक्ष सोडणार नाही. मी अन्य पक्षात जाणार नाही. पक्षाचे ध्येयधोरण हे सर्व राजकीय पक्षापेक्षा वेगळे भारतीय जनता पक्षाचे. हे मी पहिल्यापासून बोलतो आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, पक्षामध्ये काही लोक आहेत. जे अशाप्रकारचे काम करुन पक्षाला हानी पोहचवण्याचे काम करतात. त्यांच्याशी माझी लढाई आहे. मी पहिल्या दिवसांपासून बोलतो आहे मी ठाम आहे. मी पक्ष हितासाठी जे काही करायचं ते करणार. काल ही बोललो, आजही बोलतोय आणि उद्याही बोलणार. माझं पाऊल पुढे पडलं तर ते पक्ष हितासाठीच असेल हे मी वारंवार बोललोय आजही बोलतो आहे. असे गोपाळ शेट्टी म्हणाले.