garland of notes to vanchit candidate
garland of notes to vanchit candidate

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नागरिकांनी घातला साडे 5 लाखांच्या नोटांचा हार

लोहा- कंधार विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले हे सध्या चर्चेत आले आहेत. त्याचे कारणही तसं आहे. लोहा- कंधार विधानसभा मतदार संघातील माळाकोळी गावातील गावकऱ्यांनी नरंगले यांना चक्क नोटांचा हार घालून त्यांना निवडणूक खर्चासाठी देणगी दिली.
Published by :
Team Lokshahi
Published on

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षातील उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रत्येक्षात अनेक उमेदवार निवडणुकीच्या प्रचाराला देखील लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदार संघात देखील विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे.

लोहा- कंधार विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले हे सध्या चर्चेत आले आहेत. त्याचे कारणही तसं आहे. लोहा- कंधार विधानसभा मतदार संघातील माळाकोळी गावातील गावकऱ्यांनी नरंगले यांना चक्क नोटांचा हार घालून त्यांना निवडणूक खर्चासाठी देणगी दिली.

या गावकऱ्यांनी चंदा गोळा करून शिवा नरंगले यांना 5 लाख 55 हजारांची ही देणगी दिली आहे. माळाकोळी सर्कलमधून अजून 25 लाख रुपयांची देणगी शिवा नरंगले यांना देणार असल्याचे या गावकऱ्यांनी सांगितले. तर शिवा नरंगले यांनी या गावकऱ्यांचे आभार मानले. विशेष म्हणजे शिवा नरंगले हे मागच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. मतदार संघातील मतदाराच निवडणुकीच्या खर्चासाठी चंदा जमा करत असल्याने शिवा नरंगले भारावून गेले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com