विधानसभा निवडणूक 2024
Ganesh Naik : महायुतीचा उमेदवार म्हणून यशस्वी होईन असा माझा विश्वास
भाजपा महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार गणेश नाईक यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे
भाजपा महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार गणेश नाईक यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे . मतदान केंद्रात सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी गणेश नाईक यांनी मतदान केलं.
मतदान केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना गणेश नाईक म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभान निवडणूक 2024 या निवडणुकीकरता सकाळी 7 वाजताच मी मतदान केलं आहे.
लोकशाहीचा उत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदपूर्वक, गांभीर्याने आपल्या स्वत:च्या आणि राज्याचे, देशाते भवितव्य घडविण्याकरता आपलं कर्तव्य बजावा. महायुतीचा उमेदवार म्हणून यशस्वी होईन हा माझा विश्वास आहे. असे गणेश नाईक म्हणाले.