बीडमध्ये 'या' उमेदवारांना निवडणूक विभागाची नोटीस

बीडमध्ये 'या' उमेदवारांना निवडणूक विभागाची नोटीस

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • चार उमेदवारांना निवडणूक विभागाची नोटीस

  • प्रचार खर्च तपासणीला गैरहजर राहिल्यानं नोटीस

  • कुंडलिक खांडे, बाळासाहेब शिंदे, नितीन सोनवणे यांना नोटीस

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार खर्च तपासणीला गैरहजर राहिल्यामुळे बीडमध्ये उमेदवारांना निवडणूक विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष केलेला खर्च आणि त्यांनी दाखल केलेला खर्च याचा लेखाजोखा खर्च निरीक्षक पाहत आहेत.

निवडणूक विभागाने 2024 मध्ये विधानसभेसाठी उमेदवाराला प्रचारासाठी 40 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा देण्यात आली आहे. या सर्व खर्च तपासणीला कुंडलिक खांडे, बाळासाहेब शिंदे, नितीन सोनवणे हे उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे आता निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com