भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाकडून नोटीस
थोडक्यात
धनंजय महाडिकांना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता
निवडणूक आयोगाकडून धनंजय महाडिकांना नोटीस
खुलासा तात्काळ सादर करण्याचे आयोगाचे आदेश
लाडक्या बहिणींना दमदाटी करणं महाडिकांना भोवणार?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. मतदानाच्या दिवसाचे काऊंटडाऊन सुरु झालं आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे मविआकडूनही प्रचारसभा घेतल्या जात आहेत. राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला आहे. धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला आहे. 2023 चे कलम 179 अन्वेय आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता १५ ऑक्टोंबर, २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.