विधानसभा निवडणूक 2024
मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार
थोडक्यात
मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार
6 गावातील 1 हजार 300 मतदारांचा मतदानावर बहिष्कार
सूरज दहाट, अमरावती
मेळघाटमधील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून 6 गावातील 1 हजार 300 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप असून मूलभूत सुविधा, पाणी, रोड, वीज नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर, आरोग्य सेवा मिळत नाही, पिण्याचे पाणी नियमितपणे नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.