Pankaja Munde and Dhananjay Munde
Pankaja Munde and Dhananjay MundeTeam Lokshahi

पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर - धनंजय मुंडे

"मी विद्यमान आमदार असताना पंकजाताईंनी मोठं मन केलं. त्यामुळे मी आज इथे आहे", असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघात बरदापुर गावात आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते.
Published by :
Team Lokshahi
Published on

विधानसभा निवडणुकीचं मतदानाच्या दिवसाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते व उमेदवार राज्यभर प्रचार करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून निवडणूक लढत आहेत. महायुतीचे येथील अधिकृत उमेदवार आहेत. मुंडे यांनी आज परळीतील मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांची भरभरून स्तुती केली आहे.

"विधानसभेत पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. महायुती म्हणून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी माध्यमातून निवडणूक लढण्याच ठरलं. त्यावेळी मी विद्यमान आमदार असताना पंकजाताईंनी मोठं मन केलं. त्यामुळे मी आज इथे असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. परळी विधानसभा मतदारसंघात बरदापुर गावात आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, “मी मागील पाच वर्षांत मतदारसंघात भरपूर कामं केली आहेत. जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पाळली आहेत. त्यामुळे, परळीतील जनता माझ्याबरोबर आहे. निवडणुकीत येथील मतदार मला भरभरून आशीर्वाद देतील याबाबत मला शंका वाटत नाही”. तूतारीकडून निष्ठावंतांना उमेदवारी नाही. परळी मतदारसंघात जातीपाती धर्माचे राजकारण अशाच पद्धतीने तेवत ठेवायचे यासाठी? असं म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवारांना लक्ष करण्याचा धनंजय मुंडेंनी प्रयत्न केला.

"परळीत तुतारीकडून अकरा लोकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, मिळणार होती एकालाच, मीच त्यांच्या नेत्याला म्हणालो की लवकर तिकीट फायनल करा. नाहीतर दोघा तिघांना कागद वेचण्याची वेळ येईल. जे निष्ठावंत होते त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र, जे बाहेरून आले त्यांना उमेदवारी देण्यात आली. ती उमेदवारी कशासाठी दिली असेल तुतारीला जिंकण्यासाठी की परळी मतदारसंघात जातीपाती धर्माचे राजकारण अशाच पद्धतीने तेवत ठेवायचे यासाठी" असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षरीत्या शरद पवारांना लक्ष केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com