Dhananjay Mahadik : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत धनंजय महाडिक म्हणाले...

Dhananjay Mahadik : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत धनंजय महाडिक म्हणाले...

धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या श्री शाहू मार्केट यार्ड इथे असणाऱ्या मतदान केंद्रावर खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की, राज्यात, जिल्ह्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. याच कारण हेच आहे गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं दोन्ही सरकार पाहिलं. पहिल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होते. त्यानंतर अडीच वर्ष महायुतीचं सरकार होते.

पहिल्या अडीच वर्षामध्ये स्थगितीचं सरकार, घोटाळेबाज सरकार, भ्रष्टाचारी सरकार आणि घरातून फेसबुकवरुन चालवणारे सरकार हे महाराष्ट्राने पाहिलं. मात्र अलिकडच्या अडीच वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तीनही नेत्यांनी या महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाची प्रचंड गती केलेली आपण पाहत आहे. अनेक बंद पडलेलं, रखडलेलं प्रकल्प चालू झालेलं आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, वैयक्तिक लाभाच्या प्रचंड योजना दिल्यामुळे हे सरकार अतिशय लोकप्रिय झालेलं आहे. 23 तारखेला राज्यामध्ये प्रचंड मताधिक्याने महायुतीचं सरकार येईल, याचा मला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवण्याच निर्णय हा वरिष्ठ नेत्यांना आहे. आम्हाला वाटेल आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा परंतु हा सर्वस्वी निर्णय आहे. दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये असणारे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. असे धनंजय महाडिक म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com