Devendra Fadnavis Pen Sabha: पेणमधील सभेत फडणवीसांचा मविआवर निशाणा, अडीच वर्ष नादान लोकांच्या सरकारामुळे...
राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपल्या सभा घेत आहेत. दिवाळी झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून त्यांना दिलेल्या जागा आणि तेथील उमेदवारांसाठी नेतेमंडळी आपल्या सभा घेत आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून त्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
अशातच देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये प्रचारादरम्यान सभा घेतली आणि पेणमधील सभेत देवेंद्र फडणवीस मविआवर टीका करत म्हणाले, एका उमेदवाराचं नाव गती आणि प्रगती आणि दुसऱ्या उमेदवारचं नाव आहे स्थगिती याठिकाणी फडणवीस रवीशेठ पाटील यांना गती आणि प्रगतीची उपमा फडणवीसांनी दिली आहे. यासोबत ते म्हणाले आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे तर मविआ ही सगळ्या कामांना स्थगिती आहे असा टोला फडणवीसांनी मविआवर केला आहे.
हा अटलसेतू तुम्हाला मी खुप आधीच देऊ शकलो असतो. पण अडीच वर्ष नादान लोकांच सरकार आलं त्यात ही त्यांनी खोडा घातला आणि अटलसेतूची कमी केली. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आज पेण आणि मुंबईमधील अंतर लोकांना कळतचं नाही आहे. पेणवरुन सहज मुंबईला जाण शक्य झालं आहे कारण अटलसेतू 22 किलोमीटरचा हा ब्रीज आता तयार झालेलं आहे.