भाजपच्या पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीसांना सहाव्यांदा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

भाजपच्या पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीसांना सहाव्यांदा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलं आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिकीट जाहीर केलं आहे.
Published by :
shweta walge
Published on

भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलं आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिकीट जाहीर केलं आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.

ट्विट करत म्हणाले की,

भारतीय जनता पार्टीने मला विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्यांदा संधी दिली. भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी तसेच केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सन्माननीय नेत्यांचा मी नितांत आभारी आहे.

पक्षनेतृत्त्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल.

भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्याव्यतिरिक्त आणखी 98 उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा!

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीसांना सहाव्यांदा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...
मोठी बातमी! भाजपची विधानसभेसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' असतील उमेदवार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com