Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भरणार उमेदवारी अर्ज

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भरणार उमेदवारी अर्ज

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरणार असून सकाळी 9 वाजता संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com