Crossfire with Sambhaji Raje: "आम्हाला सत्तेत बसवा, मराठा आरक्षणावर तोडगा काढून दाखवतो"
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्याची महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीला पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्तीची स्थापना करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्ती सत्तेत आल्यास त्याचे महाराष्ट्राच्या विकासासाठी काय व्हिजन असेल यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आज लोकशाही वाहिनीच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.
तिसरी आघाडी नसून हा जनतेसाठी नवीन पर्याय : संभाजीराजे
"गेल्या 75 वर्षात महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधी पाहायला मिळाली नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी 2022 साली स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कोकण, खानदेश, मराठवाड्यात त्यांची व्याप्ती पाहता पक्षाची स्थापना करण्यात आली. परिवर्तन महाशक्तीतील घटक पक्षांनी मिळून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
राजकीय नेत्यांची सोयीनुसार गद्दारी : संभाजीराजे
राजकीय नितीमत्ता शिल्लक राहिली नाही. ज्येष्ठांपासून नव्या नेत्यांपर्यंत कोणामध्येही नितीमत्ता राहिली नाही. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एक सुसंस्कृत पर्याय देण्याचा पर्याय आम्ही दिल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे. फक्त स्वत:ची खुर्ची सांभळण्यासाठी राजकारण केलं जात आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठी शाळांचे खाजगीकरण : संभाजीराजे
"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मात्र, राज्यात मराठी शाळाच शिल्लक राहिल्या नाहीत. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा बंद झाल्या आहेत. शाळांचे खाजगीकरण पाहायला मिळत आहे." संभाजीराजे यांनी खंत व्यक्त केली आहे.
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत पंतप्रधान मोदी यांना आधीच पत्र व्यवहार: संभाजीराजे
"लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्यांचं उद्घाटन केले. 12 डिसेंबर रोजी मी नरेंद्र मोदी यांना पत्र व्यवहार केला होता. या पत्रामध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने उभारला गेला नसल्याचे कळवले होते. तसेच हा पुतळा बदलण्याच्या सूचना केल्या असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांसाठी काय केलं?
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन करून 8 वर्षे झाले तरीही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. 75 वर्षात गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय केलं? संभाजीराजे यांनी सवाल विचारला आहे.
मनोज जरांगे यांच्यासोबत कोणत्या विषयावर चर्चा?
मनोज जरांगे वर्षभरात योद्धा म्हणून समोर आले आहेत. मराठा म्हणून नाही तर बहुजन समाजाने एकत्र सुखाने नांदावे ही राजर्षी शाहू महाराजांची कल्पना होती. एकत्र येऊन लढावे असं मनोज जरांगेंना आवाहन करण्यात आलं आहे. उद्दिष्ट्यै एक असलेल्या मराठा समाजातील उमेदवारांनी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभे करावेत अशी इच्छा संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
परिवर्तन घडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मुंगेरी लाल के सपने बघायची आम्हाला सवय नाही. अठरापगड जाती समाजाला एकत्र घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे.
मराठा समाजाला जातनिहाय जनगणना करणे गरजेचं आहे. पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्राला काय देऊ शकतो त्यावर चर्चा करणे गरजेचं आहे. सारथी, बार्टी, महाज्योतीच्या माध्यमातून युवा पिढीला घडवू शकतो. कोकण किनारपट्टीचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा.
सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याची ज्यांची इच्छाशक्ती आहे अशा उमेदवारांना परिवर्तन महाशक्तीकडून प्राधान्य दिलं जाईल. मोजके उमेदवार उभे करणार आहोत.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा: