आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका
थोडक्यात
सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाची धोरणे बदलण्यास आणि भाजपासोबत विश्वासघात करण्याचा आरोप केला.
पंकजा मुंडे यांचे राजकारण केवळ विरोध करण्यापुरते मर्यादित आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.
भाजपाच्या विजयाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिले, त्यांच्या मेहनतीमुळेच विजय शक्य झाला, असे ते म्हणाले.
बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी 75 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. हा विजय झाल्यानंतर आष्टी मतदार संघात मोठा जल्लोष कार्यकर्त्यांनी केला. यादरम्यान आयोजित विजयी सभेत सुरेश धस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पंकजाताई तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही शिरूर येथील सभेत येतात आणि भाजपाचा पंचाखाली टाकता. तुम्हचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे सांगतात. असं म्हणत धस यांनी पंकजा मुंडें विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. पंकजाताई तुम्ही एक चांगला व्यक्ती गमावला आहे. तुमच्या जवळचे लोक बदला असा सल्ला देखील धस यांनी पंकजा मुंडेंना दिला आहे.