Maharashtra Vidhan Sabha Election | भाजपनंतर काँग्रेसची यादी कधी? संभाव्य उमेदवारांची नावं समोर?

Maharashtra Vidhan Sabha Election | भाजपनंतर काँग्रेसची यादी कधी? संभाव्य उमेदवारांची नावं समोर?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.
Published on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. कालच 20 ऑक्टोबर रोजी भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेसची पहिली यादी उद्या येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच विदर्भातील जागांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीच वाद नाही. माध्यमांनी उगीच आमच्यात भांडण लावू नये, असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी संध्याकाळी तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटप जाहीर करतील. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. मेरीटच्या आधारावर महाविकास आघाडी उमेदवार देणार आहे.

संभाव्य उमेदवारांची नावं

नाना पटोले - साकोली

विरेंद्र जगताप- धामणगाव

यशोमती ठाकूर- तिवसा

विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी

अमित झनक- रिसोड

नितीन राऊत- उत्तर नागपूर

विकास ठाकरे- पश्चिम नागपूर

रणजित कांबळे- देवळी (वर्धा)

सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर)

डॉ सुनील देशमुख - अमरावती शहर

बबलू देशमुख- अचलपूर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com