CM Eknath Shinde : फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतदान हा अधिकार आणि जबाबदारीही. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा आजचा दिवस. महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी देण्यासाठी आज प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मतदान करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावा, असे आवाहन मी मतदारांना करतो.
गेल्या पाच वर्षांतील राज्य कारभार जनतेने पाहिला आहे. २०१९मध्ये याच मतदारांनी बहुमत कुणाला दिले आणि कुणाचे सरकार आले, हे मतदारराजा विसरलेला नाही. पहिल्या अडीच वर्षांत झालेले आणि नंतरच्या अडीच वर्षांतील काम लोकांनी पाहिलेय. विकासाचे मारेकरी कोण आणि विकासाचे वारकरी कोण, हे त्यांना माहित आहे. राज्याची दशा करणारे आणि विकासाला दिशा देणारे नेमके कोण आहेत हे मतदारराजाला माहित आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, राज्यातील जनता सूज्ञ आहे. आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणणाऱ्यांना आणि राज्याचा विकास करणाऱ्यांनाच ते निवडतील. राज्याला गतिमान आणि भक्कम सरकार देतील. फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: