अजित पवारांना मोठा धक्का! समीर भुजबळांनी दिला राजीनामा; म्हणाले,'दहशतीचे वातावरण...'

अजित पवारांना मोठा धक्का! समीर भुजबळांनी दिला राजीनामा; म्हणाले,'दहशतीचे वातावरण...'

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यादी जाहीर होताच पक्षात नाराजी आणि बंडखोरीला सुरुवात झाल्याच पहायला मिळत आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यादी जाहीर होताच पक्षात नाराजी आणि बंडखोरीला सुरुवात झाल्याच पहायला मिळत आहे. यातच शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा येथे तिकीट देण्यात आलंय. मात्र, याच जागेवर माजी खासदार समीर भुजबळ देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे असून त्यांनी महायुतीविरोधात बंड पुकारलं आहे. समीर भुजबळांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत 'भयमुक्त नांदगाव' करण्याची घोषणा केलीय.

समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. 28 तारखेला समीर भुजबळ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा करीत आमदार कांदे यांची निवडणूक अवघड करीत राजकारणाला नवे वळण दिलंय. माझी भूमिका अजिबात बदलणार नाही, असंही यावेळी समीर भुजबळांनी स्पष्ट केलंय. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे असून त्यांनी महायुतीविरोधात बंड पुकारलं आहे.

समीर भुजबळ म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मी या ठिकाणी दौरे करत होतो. दहा वर्ष पंकज भाऊ इथे आमदार होते. गावपातळीवर आमचे कार्यकर्ते आहे संघटन आहे. २००९ मध्ये मी नाशिकचा खासदार होतो. महाराष्ट्रभर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. नाशिकमध्ये अनेक विकासात्मक काम केली. मुंबई नाशिक हायवे, उड्डाणपूल येरपोर्ट बोट क्लब असे अनेक काम केली. नाशिकला नाव रूपाला आणण्याचे काम केले. नाशिकमध्ये विकासात्मक काम केली अस म्हणत त्यांनी त्यांच्या कामांचा आऱाखडा मांडला आहे.

नांदगाव मधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगाव मधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com