गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार दिलीप खोडपे यांचे आरोप प्रत्यारोप
भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून यात सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांना थांबविण्यासाठी शरद पवारांकडून राजकीय खेळी करत भाजपचे एकेकाचे निष्ठावान कार्यकर्ते दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
सातव्यांदा उमेदवारी दिल्यामुळे लोकांचा प्रचंड प्रेम मिळत असून यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मते मला मिळतील असा विश्वास देखील मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. माझ्या विरोधात त्यांना उमेदवार आयात करावा लागला अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
त्यांना उमेदवारी ही जाहीर होणारच होती..हे गृहीत धरून आम्ही तयारीला लागलो होतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे विशेष नवल वाटलं नाही.. कारण त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण मला अद्यापही उमेदवारी जाहीर झाली नाही तरीही मला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तुम्ही जर म्हणत असतील की आमचा पक्षाचा माणूस /उमेदवार पळवला तर तुमच्या पक्षाने विरोधी पक्षातले मोठे मोठे नेते पळवले त्याचं काय? आपण म्हणतो जैसी करणी वैसी भरनी...त्याप्रमाणे आता मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो आहे. घोडा मैदान समोर आहे मागच्या वेळी सुद्धा ते सांगत होते की मी एक लाखाच्या मताधिक्याने तसेच सर्वात जास्त मतांनी निवडून येईल...मात्र काय झालं..तुम्ही प्रत्यक्ष बघितल असेल काय झालं असं म्हणत दिलीप खोडपे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.