Chandrshekhar Bawankule On Nana Patole: पटोलेंना राजकीय रोग झाला आहे,  बावनकुळेंनी साधला पटोलेंवर निशाणा

Chandrshekhar Bawankule On Nana Patole: पटोलेंना राजकीय रोग झाला आहे, बावनकुळेंनी साधला पटोलेंवर निशाणा

मला नाना पटोले यांची मला कीव, आणि दया येते. नाना पटोले यांना रोग झाला आहे गंभीर रोग नाही आहे तो राजकीय आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपल्या सभा घेत आहेत. दिवाळी झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून त्यांना दिलेल्या जागा आणि तेथील उमेदवारांसाठी नेतेमंडळी आपल्या सभा घेत आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून त्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

अशातच आता चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाना पटोले यांना राजकीय रोग झाले आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने देख रहे है..! असं देखील बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की, नाना पटोले आम्हाला चालणार नाही त्यामुळे बॅनर वरून त्यांचे फोटो काढले आहेत.

मला नाना पटोले यांची मला कीव, आणि दया येते. नाना पटोले यांना रोग झाला आहे गंभीर रोग नाही आहे तो राजकीय आहे. त्याला सकाळी दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 3 वाजता आणि रात्री मी मुख्यमंत्री बनणार मी मुख्यमंत्री बनणार त्यांना स्वप्न स्वप्न पडत आहेत नाना पटोले म्हणतात आहेत की मला मुख्यमंत्री बनायचं आहे. मात्र त्यांची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस मध्ये काँग्रेस मध्ये बाळा साहेब थोरात त्यांचेच नेत्यांनी फोटो काढून ठेवले आहे. उद्धव ठाकरे म्हणतात फोटो काढून टाकले त्यांची कसे 90,90,90 आहे. नाना पटोले हे मुंगेरीलाल के हसीन सपने देख रहे है..!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com