Chandrashekhar Bawankule : आमची जाहीरात ही खरी, महाविकास आघाडीची जाहीरात ही पुन्हा एकदा खोटारडेपणा
थोडक्यात
विरोधक-सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातबाजी
मविआ आणि महायुतीत जाहिरात वॉर
जाहिरातींमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यातच आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून मविआ आणि महायुतीत जाहिरात वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्याही महायुतीविरोधात जाहिराती आहेत. जाहिरातींमधून आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमची जाहीरात ही खरी आहे. महाविकास आघाडीची जाहीरात ही पुन्हा एकदा खोटारडेपणा आहे. त्यांना माहित आहे आता जाहीरातीशिवाय मार्ग नाही. ग्राऊंड घसरलं आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: