मागाठाण्यात सापडलेले पैसे कोणाचे? प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी विरारमध्ये हायव्हॉल्टाज ड्रामा पाहायला मिळाला. संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे वेधले आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीने तावडेंवर हा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील मागाठाणे येथे मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
थोडक्यात
मागाठाण्यात मोठ्या प्रमाणात सापडली रोकड
देवीपाडा भागात पैसे सापडल्यानं खळबळ
मागाठाण्यात सापडले मोठ्या प्रमाणात पैसे
पोलिसांकडून पैसे कोणाचे याचा तपास सुरु
शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप
मागाठाण्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. देवीपाडा भागात पैसे सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मागाठाण्यात मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत. पोलिसांकडून पैसे कोणाचे याचा तपास सुरु आहे. तसेच शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनसे उमेदवार नयन कदम यांची आरोप
देविपाड्यामध्ये मिक्सर, छट पूजेदरम्यान डबे वाटले गेले आहेत. याविषयी मनसेने वारंवार तक्रार केली आहे. पैसे पकडल्यानंतर ती मुले पोलिसांच्या अंगावर धावून गेले. पैशाचे लिफाफे पकडण्यात आले. मात्र, पोलिसांचा त्यावर धाक नाही. पैसे पकडल्यावर दादागिरी होत असल्याच्या घटना वाईट आहेत.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पैसे पकडण्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. लोकशाहीला ढाब्यावर बसवण्याचे काम करण्यात आलं आहे. जनतेपर्यंत या बातम्या पोहचत आहेत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोग की भाजप निवडणूक आयोग अशी शंका येत आहे. निवडणूक आयोग झोपलेला आहे. कार्यकर्ते पैसे पकडत आहेत.