Shivendra Singh Raje Bhosale Satara Javali Assembly Election: सातारा जावळी मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शिवसेनेचे अमित कदम आमनेसामने
उमेदवाराचं नाव - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
मतदारसंघ - सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ 262
उमेदवाराची माहिती - सातारा जावळी मतदारसंघ
पक्षाचं नाव - भाजप
समोर कोणाचं आव्हान- शिवसेना उभातागटाचे त्यांना आव्हान या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहे. अमित कदम. तर काही अपक्ष उमेदवार असतील.रासपाचे उमेदवार राजेंद्र माने
उमेदवाराची कितवी लढत - उमेदवारी चौथी लढत म्हणजेच पंधरा वर्षे त्यांनी आमदारकी सातारा जावळी मध्ये नेतृत्व केलेले आहे चौथ्यांदा ते उमेदवारीसाठी सातारा जावली मध्ये लढत देत आहेत.
मतदारसंघातील आव्हानं- सातारा जावळी मतदारसंघांमध्ये विशेष करून जावळी तालुक्यातील महू हादगेकर धरण बोंढारवाडी धरण यासह साताऱ्यातील एमआयडीसी व पर्यटन असे काही आहे. सातारा जावळी मतदारसंघांमध्ये विशेष करून जावळी तालुक्यातील महू हादगेकर धरण बोंढारवाडी धरण यासह साताऱ्यातील एमआयडीसी व पर्यटन असे काही विषय या निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दे आहेत
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व रस्ते पाणी समाज मंदिर त्याचबरोबर गावागावात दळणवळणाची साधने व जावळी तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांसाठी बंद असणारा प्रतापगड सकाळी साखर कारखाना त्यांनी चालवण्यास घेतला असून शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला न्याय दिला आहे.